दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. दि. १६ जानेवारी ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ६९ नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद गटांत २३ नामनिर्देशन...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक ५७ ते ६२ अंतर्गत एकूण २३ अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये —
गट ५७ बोरामणी – ४
गट ५८ कुंभारी – ८
गट ५९ वळसंग – १
गट ६० हत्तूर – ३
गट ६१ मंद्रूप – ४
गट ६२ भंडार कवठे – ३
दि. १९ जानेवारी रोजी ३ तर दि. २० जानेवारी रोजी सर्वाधिक २० अर्ज दाखल झाल्याचे दिसून येते.
पंचायत समिती गणांत ४६ अर्ज...
पंचायत समिती अंतर्गत गण क्रमांक ११३ ते १२४ मध्ये एकूण ४६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये —
गण ११५ कुंभारी – ८
गण ११९ हत्तूर – ७
गण १२४ निंबर्गी – ६
गण ११४ बोरामणी – ४
गण ११७ वळसंग – ४
गण ११८ होटगी – ४
गण १२१ मंद्रूप – ४
गण १२२ कंदलगाव – ३
गण १२० औराद – ३
उर्वरित गणांत १ ते २ अर्ज दाखल
दि. २० जानेवारी रोजी पंचायत समिती गणांसाठी सर्वाधिक ४२ अर्ज दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नामनिर्देशन प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात अर्जांची छाननी व माघारीनंतर तालुक्यातील खरी निवडणूक लढत स्पष्ट होणार आहे.


0 Comments