मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालय व माय भारत केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माय भारत केंद्र सोलापूर शाखेचे धनराज पाटील यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे विश्वस्त नागेश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी खोखो मैदानाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. धनराज पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन जगताप यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षपदावरून बोलताना नागेश बिराजदार म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची हिच संधी असते. त्यामुळे प्रत्येकाने भाग घेऊन आपले नैपुण्य दाखवावे. खेळात सातत्य ठेवल्यास शारीरिक व मानसिक प्रगती साधता येते शिवाय गुणवंत खेळाडूच पुढे यशस्वी होतात व कॉलेज बरोबरच गावाचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतात. शेवटी त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ शिवानंद तोरवी यांनी केले . सूत्रसंचालन प्रा डॉ श्रीमती बी एस कोरे यांनी तर आभार प्रा व्हि एस गडगी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





0 Comments