मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज| प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
आपण चांगले दिसावे, यासाठी धडपडत असतो. मात्र केवळ चांगले दिसणे म्हणजे व्यक्तिमत्त्व नसून, सद्विचार, सद्भावना अन् वर्तणुकीचा समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्त्व होय, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पी. एल. सूर्यवंशी यांनी केले. ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप होते. यावेळी प्रा. आर. एम. काळे, प्रा. डॉ. एस. बी. धनशेट्टी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, वेळेचे नियोजन ज्याला जमते तो यशस्वी होतो. जीवनात वेळेच्या नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमचा आहार, विहार, उच्चार यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. यामध्ये व्यायामालाही विशेष महत्त्व आहे. प्राचार्य डॉ. जगताप म्हणाले, फक्त ज्ञान असून, पुरेसे नाही तर आपल्यातील शक्तीचे योग्य व्यवस्थापन करता आले पाहिजे. आपल्यातील ऊर्जा योग्य ठिकाणी, योग्य वेळी वापरता आली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऊर्जा व्यवस्थापनाचीही सवय लावून घेतली पाहिजे. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सी. एस. मुलगे यांनी प्रास्ताविक केले. कु.धानेश्वरी जमादार हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. कु.सदफ शेख हिने सूत्रसंचालन केले. उमेश तुपे याने आभार मानले.



0 Comments