Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पंचायत समिती गणातून भाजपची उमेदवारी मळसिद्ध मुगळेंना; एबी फॉर्मवरून संभ्रम अखेर संपला...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

मंद्रूप पंचायत समिती गणात भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. भाजपकडून मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंडगुदले यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाल्याने एकाच गणात दोन उमेदवार असल्याची स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, हर्षवर्धन देशमुख यांना एबी फॉर्म मिळालेला नसतानाही त्यांनाच एबी फॉर्म दिल्याचे भाजपच्या काही नेतेमंडळींकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान मळसिद्ध मुगळे व रेवणसिद्ध मेंडगुदले यांना एबी फॉर्म प्राप्त झाल्याची अधिकृत नोंद घेतली. यानंतर या दोघांपैकी कोणाचा उमेदवारी अर्ज वैध मानायचा, याबाबत आज दुपारी दोन वाजल्यानंतर सविस्तर सुनावणी घेण्यात आली.

अखेर सुनावणीनंतर मंद्रूप पंचायत समिती गणातून भाजपची अधिकृत उमेदवारी मळसिद्ध मुगळे यांना देण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे या गणातील भाजपचा उमेदवार निश्चित झाला असून निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे.


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क:

प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

हॅलो रिपोर्टर न्युज

मोबाईल: 9923393329

Post a Comment

0 Comments