Advertisement

Breaking News
Loading...

दहावी- बारावी वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मिळावी सूट... बहुजन शिक्षक महासंघाने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज |

सध्या सर्व शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी सराव परीक्षा सुरू असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा व इयत्ता दहावीची 2 फेब्रुवारीपासून  प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. तसेच 4 फेब्रुवारी व 5 फेब्रुवारी रोजी बऱ्याच शाळा, महाविद्यालयात या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता इयत्ता दहावी व बारावी वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना खात्री करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कर्तव्यातून सूट द्यावी. तसेच या इयत्तेवरील काही शाळेतील शिक्षकांना शिपाई सोडून इतर सर्वांना नेमणूक आदेश आलेले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाचे दोन दिवस आणि निवडणुकीचे दोन दिवस अशी चार दिवस शाळा परीक्षेतील कालावधीत बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.



तरी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे लेखी हमीपत्र घेऊन त्यांची निवडणूक कर्तव्यातून सूट द्यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड आदींनी दिले आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाचा सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांना दिली.

Post a Comment

0 Comments