Advertisement

Breaking News
Loading...

घरफोडी प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..! चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या सराफास अटक; ६ गुन्ह्यांतील तब्बल ₹ 7.89 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त...

 


सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोर्टर न्यूज|मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या सराफाकडून तब्बल ५२.६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची बाजारमूल्याप्रमाणे किंमत ₹7,89,700 इतकी आहे.



सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कारवाई करत ६ घरफोडी प्रकरणांचा उलगडा केला.


आरोपींकडून कबुली:
तपासादरम्यान आरोपी रोहित दिपक पवार याने उंबरे दहिगांव येथील घरफोडी गुन्ह्यात भोलेनाथ उर्फ शन्या भोसले (रा. चाकोरे, अकलूज) व भैय्या शकील शेख (रा. विजबोर्डजवळ, वेळापूर) यांच्या संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली.

रोहित पवार याने त्याच्या वाट्याला आलेले सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने अकलूज येथील सराफ वैभव दिगंबर कुलथे यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित सराफास अटक करण्यात आली.

आईकडून दागिने हस्तगत:
अटकेनंतर आरोपी वैभव कुलथे याने चोरीचे दागिने त्याच्या आईकडे ठेवल्याची माहिती दिली. दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याच्या आईने तपास अधिकाऱ्यांकडे दागिने स्वाधीन केले.

माळशिरस (४), वेळापूर (१) व अकलूज (१) अशा एकूण ६ गुन्ह्यांतील ५२.६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment

0 Comments