Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; २०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी लाभार्थी...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे पोलीस दलातील अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.


या शिबिरात डॉ. हेमंत लोढा (रुद्राक्ष थेरपी) यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सविस्तर तपासणी केली. सोलापूर ग्रामीण पोलीस घटकातील सुमारे 200 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तपासणीनंतर आवश्यक त्या उपचारांसह रुद्राक्ष थेरपी देण्यात आली.



सदर आरोग्य शिबिर उद्या दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजीही सुरू राहणार असून उर्वरित अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.




यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येईल. तणावपूर्ण कर्तव्यात आरोग्य जपणे अत्यावश्यक असून, या शिबिरातून आरोग्याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.



कार्यक्रमास पोलीस निरीक्षक कुंभार साहेब, पोवार साहेब, देशपांडे साहेब, कदम साहेब, जकिकोरे साहेब तसेच रापोनि श्री. कांबळे साहेब आणि इतर अधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments