सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : सोलापूर शहरातील रूपा भवानी मंदिराजवळ, सिद्धेश्वर उमन्स पॉलीटेकनिक कॉलेज समोर सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात होऊन तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र बर्गमन स्कूटर (MH-13-ER-0627) वरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही युवक रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे –
नागेश प्रकाश गवंडी (२७, रविवार पेठ, सोलापूर )
रोहन अशोक कोरे (२३, श्रीशैल नगर, भवानी पेठ, सोलापूर )
बसवराज सुनील चनशेट्टी (२५, शेळगी, सोलापूर)
घटनेची माहिती मिळताच Jodbhavi Peth Police Station चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तिघांना श्री छत्रपती Shivaji महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघात घडवून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

0 Comments