मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंद्रूप शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या वक्तव्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे.
रवी म्हेत्रे व अनिल जोडमोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंद्रूप येथील शिव बसव चौक, बाजारपेठ परिसरात सपकाळ यांच्या प्रतिमेस ‘जोडेमारो’ आंदोलन करत तीव्र निषेध नोंदविला. कार्यकर्त्यांनी प्रतिमेला जोडे मारत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि संबंधित वक्तव्याबाबत सपकाळ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी केली.
या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून मंद्रूप बाजारपेठ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनात अविनाश कोळी, दादा ख्याडे, भारत मरिवले, तायाप्पा कोळी, अण्णा नवले, नितीन अहिरवाडी, विनायक कट्टीमनी, सिद्धाराम ख्याडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेमुळे मंद्रूप शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



0 Comments