मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लू अण्णा कांबळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील राउंड टेबल जीवनज्योत प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पाडला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मंद्रुप महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जवाहर मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे सहसचिव प्रा.सुबोध कोळी व संचालीका राधिका पाटील या लाभल्या होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एम.कमळे हे होते.
प्रारंभी संस्थापक दी शि कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर प्रास्ताविक सहशिक्षक दिपक कांबळे यांनी केले.
याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करुन शाळा,शिक्षक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सहशिक्षक चेतन आवटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.तर प्रा सुबोध कोळी यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन करताना प्रा डॉ जवाहर मोरे म्हणाले की, दहावीचे वर्ष म्हणजे शिक्षणाचा पाया आहे. हा पाया भक्कम होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व उत्तीर्ण व्हावे. महामानव, विचारवंत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आचरण करत आई वडील व गुरुजनांची स्वप्नं पूर्ण करावीत. मोबाईलच्या नादाला लागून वेळ व बुद्धी वाया घालवू नका. उंच ध्येय गाठण्याचे हेच वय असून उत्साही व आनंदी वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी राबवावे असे मोलाचे सल्ले दिले.
अध्यक्षीय समारोप करताना पी एम कमळे यांनी , शिक्षकांनी कष्ट घेऊन या विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे. याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी यश पदरात पाडून घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृध्दी कोले हिने केले तर आभार कु. रेणुका शिवशरण हिने मानले.





0 Comments