सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या अध्यक्षपदी संजीव इंगळे तर सचिवपदी इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार आनंदराव बिराजदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
ही सभा गुरुवारी (दि. १९ फेब्रुवारी) होटगी रोडवरील हॉटेल किनारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
संघाचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष येणगुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नवीन कार्यकारिणीच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी संजीव इंगळे आणि सचिवपदासाठी आनंदराव बिराजदार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, पत्रकार बिसलसिद्ध काळे, शिवदास वाडकर, रामय्या स्वामी, नारायण घंटे आदी ज्येष्ठ पत्रकार व तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव इंगळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी व संघटनेच्या मजबुतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


0 Comments