मुंबई | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अमर अण्णा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल शिंदे साहेबांचे आशीर्वाद घेत पुढील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांसाठी भीमा व सीना नदीपात्रात उजनी धरण येथून तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली. सध्या पाण्याअभावी शेतकरी व नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी उभारणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. उद्योगनिर्मितीमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिंदे साहेबांनी संबंधित मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अमर अण्णा पाटील यांनी दिली.
या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





0 Comments