मुंबई | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मंत्रालयाचे प्रमुख आणि Pharma, Health Care & Wellness Committee चे अध्यक्ष मा. मंगेशजी चिवटे साहेब यांची सोलापूरचे जिल्हाप्रमुख मा. अमर अण्णा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
रुग्णांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण भेट:
सोलापूर : राज्यातील गरजू रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने सोलापूरचे जिल्हाप्रमुख मा. अमर अण्णा पाटील यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाशी निगडित वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मा. मंगेशजी चिवटे साहेब यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत सोलापूर जिल्ह्यातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपचारासाठी आर्थिक मदतीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मा. अमर अण्णा पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रस्ताव त्वरीत सादर करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर मा. मंगेशजी चिवटे साहेब यांनीही पात्र रुग्णांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या सकारात्मक चर्चेमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली असून, रुग्णकल्याणासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.


0 Comments