Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर शहर गुन्हे शाखेचा दणका! आंतरराज्यीय दुचाकी चोरटे जेरबंद; ६ मोटारसायकलींसह १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. कर्नाटक राज्यातील दोन आंतरराज्यीय चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल ६ मोटारसायकली व १,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

कशी उलगडली चोरीची साखळी?

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण सुरू केले होते.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे गंगामाई हॉस्पिटल परिसरात सापळा रचण्यात आला आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपी कोण?

प्रमोद अर्जुन जेऊर (वय 21, कर्नाटक)

अमोल भाऊसाहेब चव्हाण (वय 26, कर्नाटक)

चौकशीत त्यांनी सोलापूर शहरातून मागील ६ महिन्यांत ६ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यांचा तपशील:

सदर बाजार, फौजदार चावडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड

भा.न्या.सं. २०२६ कलम ३०३(२) अंतर्गत कारवाई

सर्व मोटारसायकली कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातून हस्तगत

पथकाचे कौतुक:

या यशस्वी कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकातील अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. त्यांच्या तांत्रिक तपास आणि सतर्कतेमुळे ही मोठी चोरीची साखळी उघडकीस आली.

या कारवाईत खालील मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या:

MH-13-DP-1927 – कि.₹15,000

MH-10-BY-4692 – किं.₹10,000

MH-13-BD-0532 – किं.₹15,000

MH-13-AY-7752 – किं.₹35,000

MH-13-BW-3997 – किं.₹50,000

MH-13-ED-4413 – किं.₹50,000

    एकूण मुद्देमाल: ₹1,75,000

ही सर्व वाहने सदर बाजार, फौजदार चावडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सोलापूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही चलाख असले तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाहीत. शहरातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

Post a Comment

0 Comments