Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप ईदगाहवर ईदचा जल्लोष; हजारोंनी नमाज अदा, शांततेत उत्सव संपन्न...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने मंद्रूप येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज अदा केली. अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा धार्मिक सोहळा पार पडला.

यावेळी मोलाना अब्बास रजा यांनी उपस्थित सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव, एकता आणि शांततेचा संदेश दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण पार पडले.


दरम्यान, मंद्रूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, हेड कॉन्स्टेबल नाना अवघडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे यांनी ईदगाह येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुस्लिम बांधवांकडून पोलिसांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडला असून, मंद्रूपमध्ये सामाजिक सलोखा आणि एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.



Post a Comment

0 Comments