सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : सोलापूरचे सुप्रसिद्ध गायक तथा ‘महाराष्ट्राचे महागायक’ विजेते मोहम्मद अयाज यांना ‘नेल्सन मंडेला इंटरनॅशनल पीस अवॉर्ड 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबई येथे दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी पंचतारांकित हॉटेल रेडिसनमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
मेहूल कुमार, दिलीप सेन, संजीवकुमार चौधरी, एसीपी संजय पाटील यांच्या उपस्थितीत मोहम्मद अयाज यांना पुरस्कार प्रदान करतानाचा क्षण.
भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माता-निर्देशक मेहूल कुमार व संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते अयाज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास पोलीस महानिरीक्षक मोहन राठोड, संजीवकुमार चौधरी, एसीपी संजय पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंत आणि साहित्यिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
मोहम्मद अयाज यांनी दक्षिण आफ्रिकेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भारतीय संगीताचा प्रसार केला आहे. गाण्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अयाज यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आपल्या गुरुवर्य स्वरस्वामिनी आशाताई भोसले यांना समर्पित केला.
“हा पुरस्कार माझ्या संगीत प्रवासाला अधिक प्रेरणा देणारा ठरेल,” अशी भावना मोहम्मद अयाज यांनी व्यक्त केली.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!



0 Comments