Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू न मिळाल्यास १ मे रोजी आंदोलनाचा इशारा...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : मोहोळ तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी केला आहे.


अनिल पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी, सोलापूर, मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. तहसीलदार मोहोळ, तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांना निवेदन सादर करून घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मोहोळ तालुक्यात अनेक कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र वाळू उपलब्ध नसल्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.”

तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर तात्काळ वाळू उपलब्ध करून दिली नाही, तर दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत तहसील कार्यालय मोहोळ समोर हलगी वाजवून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments