कामती | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वास दृढ व्हावा तसेच तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण होऊन जनजागृती व्हावी, या उद्देशाने कामती पोलीस ठाण्याच्या वतीने ‘पोलीस मित्र चषक’ व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद देत मैदान अक्षरशः गाजवले.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि नुकतेच पदभार स्वीकारलेल्या सहायक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्कीकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.
११ एप्रिल २०२६ रोजी पोलीस ठाण्याच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत कामती बुद्रुक, कामती खुर्द, कुरुल, कोरावली, मिरी, सोहाळे आदी गावांतील संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रत्येक सामना शिस्तबद्ध आणि रोमांचक पद्धतीने पार पडत प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मेडल आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या निमित्ताने खेळाडूंनी अशा स्पर्धा वारंवार आयोजित करण्याची मागणी व्यक्त केली. कम्युनिटी पोलिसिंगचा एक सकारात्मक नमुना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
या स्पर्धेचे आयोजन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
आयोजन यशस्वी करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्कीकोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जाधव, तसेच प्रमोद आसादे, शितल साळवी, भरत चौधरी, संतोष लोहार, रमेश वाघमारे, विकास येळपूरे, संजय देवकर, अनुप दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments