शिक्षण क्षेत्रात एखादी व्यक्ती जेव्हा आपली दोन दश कांहून अधिक काळ निष्ठेने समर्पित करते, तेव्हा ती केवळ एक कर्मचारी राहत नाही, तर ती एक विचार आणि संस्था बनते. माझे जिवलग मित्र आणि स्नेही आदरणीय कल्याणराव लक्ष्मण बरडे सर ( B.SC B.Ed ) हे अशाच एका झंझावती आणि प्रेरणादायी परवाचे नाव आहे. आपल्या 28 वर्षाच्या गौरवशाली आणि नि:स्पृह शैक्षणिक कारकीर्दीनंतर 31 मे 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत.
' वडगाव शिंदे विद्यालयाचा आधारस्तंभ कल्याण बरडे सर.'
सरांनी आपल्या सेवेचा बहुतांश काळ कै. आबासाहेब गोसावी माध्यमिक विद्यालय, वडगाव शिंदे (ता. हवेली) या विद्यालयासाठी वेचला. 9 जून 1998 रोजी सुरू झालेला हा प्रवास एका ध्येयाने प्रेरित होता. दोन वर्षे प्रभारी मुख्याध्यापक आणि त्यानंतर सलग 23 वर्षे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेची धुरा सांभाळली. या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केवळ प्रशासकीय काम पाहिले नाही, तर शाळेला शिस्त, संस्कार आणि गुणवत्तेचे केंद्र बनवले. ग्रामीण भागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने फुलवण्याचे आणि ती सत्यात उतरवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
'पारदर्शक नेतृत्व आणि संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्व म्हणजे कल्याण बरडे सर.'
त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून असलेली कारकीर्द. शाळा कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आमदार दत्तात्रय सावंत सरांच्या सोबतीने शिक्षकांच्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडली विनाअनुदानित शिक्षकांच्या लढ्यामध्ये अग्रभागी राहून पुणे जिल्ह्याचे नेतृत्व केले. प्रदेश कोषाध्यक्ष या पदावर काम करत असताना त्यांनी दाखवलेले आर्थिक पारदर्शकता, हिशोबातील अचूकता आणि संघटनेच्या हितासाठी असलेली तळमळ ही सर्वांसाठी आदर आहे. त्यांच्या शब्दाला एक वेगळे वजन असून सहकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास आणि आदर आहे. निष्ठावंत समाज प्रहरी म्हणून ही त्यांची ओळख आहे.
शिक्षकी पेशा सोबतच सरांचा सामाजिक वावरही तितकाच प्रभावी राहिला आहे. आदरणीय आमदार दत्तात्रय सावंत सर यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकार्य म्हणून त्यांनी नेहमीच मूल्यांचे राजकारण आणि दर्जेदार शिक्षणाचा आग्रह धरला. आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सरांचे शैक्षणिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी बरडे सरांनी अहोरात्र कष्ट घेतले. विज्ञानाची तर्कशुद्ध दृष्टी ( B.SC ) आणि शिक्षणाची आवड ( B.Ed ) यांच्या अजोड संगमातून त्यांनी एक आदर्श पिढी घडवली.
शाळेच्या भौतिक सुविधांपासून शैक्षणिक दर्जा सुधारण्यापर्यंत त्यांनी कृती समितीच्या माध्यमातून जे योगदान दिले ते विसरता येणार नाही. लोकसहभाग कसा मिळवावा आणि शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचवाव्यात याचे ते उत्तम जाणकार आहेत. शाळेची इमारत उभी करण्यापासून ते डिजिटल शिक्षणापर्यंत सरांनी घेतलेले कष्ट डोळ्यासमोर उभे राहतात. विचारांशी आणि कार्यांशी असलेले अढळ निष्ठा हे त्यांचे बलस्थान आहे.
शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि राजकीय नेते या सर्वांशी त्यांचा सुसंवाद असतो. मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही. असे असणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व 31 मे 2026 रोजी सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांचे कार्य संपलेले नाही. त्यांनी लावलेली ही ज्ञानज्योत हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने अखंड तेवत राहील. 28 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी कमावलेली सर्वात मोठी पुंजी म्हणजे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांना लाभलेला लोकांचा आदर.
' 1998 ची ती रोवणी, आज वटवृक्ष जाहली. तुमच्या कष्टांचा हा सुगंध, दशदिशेला फाकला.
कोषाध्यक्ष म्हणून आपण विश्वासाची धुरा सांभाळली अचूकता आणि निष्ठेने, संघटनेची प्रतिष्ठा वाढवली. मुख्याध्यापक पदाची शान, 23 वर्षे आपण जपली, वडगाव शिंदेंच्या पावनभूमीत ज्ञानाची गंगा वाहिली.
सावंत सरांची साथ अन, निष्ठा अढळ तुमची, आठवण सदैव राहील, तुमच्या या प्रेमळ कार्याची.
निवृत्तीच्या हा क्षण म्हणजे, नव्या पर्वाची सुरुवात. सुख समृद्धी सदैव नांदो तुमच्या या प्रेमळ कार्याची.'
आदरणीय, बरडे सरांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य अत्यंत आनंददायी, सुख- समृद्धीचे आणि दीर्घायुष्याचे जावो, हीच आम्हा सर्व स्नेहांच्या वतीने ईश्वरचरणी नम्र प्रार्थना!
आपलाच...
राजेंद्र महादेव आसबे
सहशिक्षक- साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तावशी
संपर्कप्रमुख- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्हा
जिल्हाध्यक्ष- सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ सोलापूर
संचालक- सोलापूर जिल्हा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, पंढरपूर..
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329


0 Comments