Advertisement

Breaking News
Loading...

नांदणीच्या ग्रामदैवत नागम्मा देवी यात्रेत श्रद्धेचा महापूर; अग्नीप्रवेशानंतर महाप्रसाद, कुस्तीचा जल्लोष...

 


नांदणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे परंपरेनुसार यावर्षीही १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी ‘श्री नागम्मा देवी यात्रा’ महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा होत आहे.


ग्रामदैवत नागम्मा देवीच्या या यात्रेसाठी सोलापूरसह शेजारील कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविकांनी हजेरी लावली असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


रविवार, दि.१९ एप्रिल रोजी यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला. सकाळी १० वाजता भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ‘अग्नीप्रवेश’ सोहळा पार पडला. या सोहळ्यात भक्तांनी अनवाणी पायाने धगधगत्या कोळशावरून चालत आपली श्रद्धा व्यक्त केली. या अद्भुत आणि रोमांचकारी विधीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


यात्रेत भक्ती, शक्ती आणि लोककलेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. सायंकाळी ५ वाजता नामवंत मल्लांच्या जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

यात्रेची सांगता रात्री १० वाजता ‘मातृ विदित मौन गोविंद’ या विशेष नाटकाने होणार असून, या दोन दिवसांच्या महोत्सवाने नांदणी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329

Post a Comment

0 Comments