सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे लाईन परिसरात सोनाई फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भीमसैनिकांसाठी तब्बल २५ क्विंटल पुलाव तयार करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यासोबतच उपस्थितांना थंडगार सरबताचेही मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे नेतृत्व सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी केले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी अनेक दिवस नियोजन करून व्यापक तयारी केली होती. मिरवणूक मार्गावरच सुयोग्य नियोजनासह भोजन व सरबत वितरणाची व्यवस्था करण्यात आल्याने हजारो भीमसैनिकांनी कोणतीही अडचण न येता महाप्रसादाचा लाभ घेतला.
या उपक्रमात किस्मत चौक मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचेही मोलाचे सहकार्य लाभले. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने गर्दी नियंत्रण, भोजन वितरण आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या आंबेडकर जयंतीत या उपक्रमाने वेगळेपण जपले. समाजातील ऐक्य, बंधुता आणि सेवा भाव वृद्धिंगत करणारा हा उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून नागरिक आणि भीमसैनिकांकडून त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329




0 Comments