Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी मोहीम; मंदिर-मशिदींवरील ९३८ अनधिकृत भोंगे हटवले...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. २४ एप्रिल : सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत मंदिर व मशिदींवरील एकूण ९३८ अनधिकृत भोंगे काढण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


या मोहिमेदरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मंदिरांवरील ५८१ तर मशिदींवरील ३५७ भोंगे असे एकूण ९३८ भोंगे नियमबाह्य असल्याचे आढळून आले. पोलीस प्रशासनाने हे सर्व भोंगे नियमानुसार हटवले.


महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण कारवाई अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही समाजातील नागरिकांनी कायद्याचा आदर राखत पोलिसांना सहकार्य केले. तसेच संबंधित धर्मस्थळांचे पदाधिकारी व विश्वस्त यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मोहिमेला पाठिंबा दिला.


या कारवाईमुळे जिल्ह्यात ध्वनीप्रदूषण नियंत्रणास मदत होणार असून सामाजिक सलोखा व शांतता टिकवण्यास हातभार लागणार आहे. भविष्यातही नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.



आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments