Advertisement

Breaking News
Loading...

बार्शीत पोलीसांची धडक कारवाई; गांजा व अवैध दारू प्रकरणात 1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


बार्शी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |दि. 24 एप्रिल: सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने बार्शी शहरात गांजा विक्री व अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर मोठी कारवाई करत एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली.


पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बार्शी शहरातील सुभाषनगर परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत सिने स्टाईल कारवाई केली. यावेळी दोन जणांच्या ताब्यातून सुमारे 534.96 ग्रॅम गांजा, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 89,884 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत MSEB कार्यालयासमोर असलेल्या पानटपरीवर अवैधरीत्या देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी छापा टाकून 70,195 रुपयांचा दारू साठा जप्त केला असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीसांकडून अमली पदार्थ व अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरू असून पुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments