मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे मड्डी परिसरात राहणारे शेतकरी इब्राहिम हुसेनी नदाफ यांच्या शेतातील कडब्याला मंगळवार (दि. 28 एप्रिल 2026) रोजी दुपारी सुमारे 4 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान अचानक अज्ञात कारणामुळे आग लागली. या आगीत कडबा पूर्णपणे जळून खाक झाला.
या घटनेत कडब्यासह आजूबाजूला ठेवलेले केबल, दोऱ्या आणि इतर शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्यही जळून नष्ट झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आगीची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी इब्राहिम नदाफ यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments