Advertisement

Breaking News
Loading...

भीमगर्जना प्रतिष्ठान, नवीन टाकळी येथे संयुक्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न...

 


नवीन टाकळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती तसेच समतेचे नायक, दक्षिण भारताचे बुद्ध महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीमगर्जना प्रतिष्ठान, नवीन टाकळी येथे भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.


भीमगर्जना प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विचारजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंती उत्सवाच्या कालावधीत व्याख्याने व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. याच परंपरेचा भाग म्हणून तीनही महापुरुषांची संयुक्त शोभायात्रा टाकळी गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.


या शोभायात्रेस राजकुमार गायकवाड यांनी अन्नदान केले, तर रेवप्पा साबळे व दिलीप साबळे यांनी देखाव्यासाठी सहकार्य केले. मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाज बांधवांनी थंड पाणी व केळी वाटप करून स्वागत केले, यामुळे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.


दरवर्षीप्रमाणे दिव्यांग दाम्पत्य बाबुराव व रेखा साबळे यांचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. या शोभायात्रेत टाकळी, चिंचपूर, कुरघोट, बरूर, वडकबाळ, नांदणी येथील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


नांदणी येथील भीम क्रांती प्रतिष्ठानच्या लेझीम पथकाने आकर्षक लेझीम नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


उत्सव अध्यक्ष रेवणसिद्ध बटगी, उपाध्यक्ष दिनेश नायकर तसेच प्रतिष्ठान प्रमुख चंद्रशेखर गायगवळी यांच्या नेतृत्वाखाली जयंती उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.


या कार्यक्रमास बसवराज सुतार, ईरण्णा भालेकर, हाफिज फिरोज शेख, साहेबलाल नदाफ, विद्यानंद लोणीकर, मडिवाळेश्वर कट्टीमनी, शिवानंद उबाळे, माळप्पा दुधभाते, शिवानंद शिवशरण, नितीन डुरके, राम शिवशरण, नितीन सोलापूरे, रमेश साबळे, बोलुशा साबळे, दिलीप साबळे, राजशेखर गायगवळी, अमोल दुपारगुडे, अतिश घडेराव, प्रकाश साबळे, गणेश साबळे, सुंदर उबाळे, सदाशिव वाघमारे, राकेश उमरगे, गजानंद कट्टीमनी, सचिन कांबळे, मल्लिकार्जुन साबळे, श्रीधर कोळी, भारत साबळे, समीर बोरगी, आकाश भोई, तुषार शिवशरण, अविनाश शिवशरण आदी मान्यवर उपस्थित होते.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments