सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच रात्रीत तीन ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकत अवैध प्रकारांना आळा घातला. कोंडी, खेड आणि बळेवाडी (बार्शी) येथील कसिनो, सुखसागर आणि सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी १७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री छापे टाकले. या कारवाईत बारमध्ये परवान्याच्या वेळेनंतरही व्यवसाय सुरू ठेवणे, महिलांकडून अश्लील नृत्य करून घेणे, तसेच नोटासदृश्य कागदांची उधळण करणे असे प्रकार उघडकीस आले.
कारवाईचा तपशील:
कोंडी येथील कसिनो बार :
११ महिला व २३ ग्राहक आढळले; सुमारे ४६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त...
खेड येथील सुखसागर बार :
७ महिला व १८ ग्राहक; १८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त...
बळेवाडी येथील सेन्ट्रो बार :
१८ महिला व ९ ग्राहक; ५७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त, यात साउंड सिस्टम, मोबाईल, वाहने आणि तलवारीचाही समावेश...
एकूण कारवाई:
३ गुन्हे दाखल
९१ आरोपींवर कारवाई
१,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित बार मालक, व्यवस्थापक व ग्राहकांवर महाराष्ट्रातील लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल नवले, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, देवीदास कारंडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सोलापूर ग्रामीण पोलिसांची ही कारवाई शहरातील अवैध ऑर्केस्ट्रा बारवर मोठा धाक निर्माण करणारी ठरली आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329



0 Comments