सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हा निकाल दिला. राजकुमार सायबु खेत्री (वय २३, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणातील पीडित मुलगी आणि आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले होते. त्यानंतर आरोपीने विविध वेळा तिला बोलावून वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
घटनेनंतर पीडितेने ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बी. एस. गायकवाड यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले, तर बचाव पक्षाने २ साक्षीदार सादर केले. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस २० वर्षे सक्त कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकारतर्फे ॲड. कबिता बागल, ॲड. शितल डोके व ॲड. एस. एस. क्यातम यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे ॲड. ए. एन. शेख यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती एस. एस. घाडगे यांनी काम पाहिले.
टीप: पीडितेची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्याशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329

0 Comments