Advertisement

Breaking News
Loading...

धडाकेबाज कारवाई! सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवैध हातभट्टी अड्डे जेसीबीने उद्ध्वस्त — ₹ 7.45 लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. ६ जून २०२६ – सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध हातभट्टी व्यवसायावर धडक कारवाई करत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे मोठा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत अंदाजे ₹७,४७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छाप्यामध्ये हातभट्टी तयार करण्यासाठी वापरले जाणारे गुळ-मिश्रित रसायन, लोखंडी व प्लास्टिक बॅरल, चुली तसेच इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण अड्डा नष्ट करत अवैध व्यवसायाला मोठा धक्का दिला. याशिवाय ड्रोनच्या मदतीने परिसराची पाहणी करून कारवाई अधिक प्रभावी करण्यात आली.

या प्रकरणी चार सराईत हातभट्टी व्यवसायिकांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई अतुल वी. कुलकर्णी (पोलीस अधीक्षक) व विजय कबाडे (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकात विजय शिंदे, ज्ञानदेव वाघ यांच्यासह ई. मुजावार, गायकवाड, निलकंठ जाधवर, पांढरे, फैयाज बागवान, असिफ शेख, कटकोंड व इतर अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

पोलीस प्रशासनाने इशारा दिला असून, अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.



Post a Comment

0 Comments