Advertisement

Breaking News
Loading...

लोकमंगलकडून १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान...


भंडारकवठे | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : लोकमंगल साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. गुरुवार, दि. ०४/०६/२०२६ रोजी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध करिअर कौन्सिलर आनंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक संधी तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन सोप्या भाषेत दिले.

सन्मानित विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत लोकमंगल परिवाराचे आभार मानले व पुढील शैक्षणिक वाटचालीत यशस्वी होण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी लोकमंगल समूहाचे अध्यक्ष महेश देशमुख, संचालक पराग पाटील, प्रशांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन पिसे, कंपनी सेक्रेटरी नयना राठी, आयटी मॅनेजर अविनाश अवचर तसेच प्रशासकीय व्यवस्थापक नंदकिशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments