Advertisement

Breaking News
Loading...

“बसव नगर येथे भरधाव दुचाकी पुलाखाली कोसळली; सोलापुरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू”

 





बसवनगर (मंद्रूप )|हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉराजदत्त रासोलगीकर |विजापूर–सोलापूर महामार्गावर गुरुवारी (दि. ११ जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोकुळसिंग लंगडेवाले (वय ५२, रा. हुच्चेश्वर नगर, सोलापूर) हे त्यांच्या दुचाकीवर (एमएच १३ ईयू ४०९५) मित्र शाम सिद्राम भोसले (वय ५७, रा. भीमाई नगर, सोलापूर) यांच्यासह कामानिमित्त टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे गेले होते.

दुपारी सुमारे ४.२० वाजता परत येताना बसवनगर शिवारातील दत्ता शेंडगे यांच्या शेताजवळील छोट्या पुलाजवळ दुचाकीचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली खड्ड्यात कोसळले. अपघात इतका भीषण होता की विजय लंगडेवाले यांचा जागीच मत्यू झाला.

गंभीर जखमी झालेल्या शाम भोसले यांना तातडीने सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. महामार्ग पोलिस व पेट्रोलिंग पथकाने घटनास्थळी पंचनामा केला.



या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मंद्रूप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments