Advertisement

Breaking News
Loading...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बरोबर झालेल्या प्रदीर्घ बैठक व ठोस आश्वासनानंतर सोलापूर विकास मंचाचे आंदोलन संस्थगित...

 


सोलापूरच्या प्रलंबित विकास प्रश्नांवर येत्या काही दिवसांत  सकारात्मक निर्णयाचे आश्वासन तसेच सोलापुरचे प्रश्नांबाबत मा मुख्यमंत्री यांचे बरोबर बैठक ही घेण्याचे पालकमंत्री यांचे सुतोवाच. यामुळे सोलापूर विकास मंचाने दिला सरकारला अवधी...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |दि. ११ जुन २०२६: सोलापूर शहराच्या विविध प्रलंबित विकास प्रश्नांवर शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, पुनम गेट, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले सोलापूर विकास मंचाचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मंचाच्या वतीने देण्यात आली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या समवेत सोलापूर विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक काल म्हणजे १० जानेवारी रात्री उशिरा  पार पडली. यावेळी मंचाच्या सदस्यांनी सोलापूरच्या विविध विकास विषयांबाबत सविस्तर चर्चा करून शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

बैठकीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, सोलापूर विमानतळावरील विमानसेवा, नाईट लँडिंग सुविधा, आय.टी. पार्क, परिवहन बस सेवा, पाणीपुरवठा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच इतर प्रलंबित विकास विषयांबाबत केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.तसेच काही बाबतीत आपण मुख्यमंत्री यांचे बरोबर या महत्त्वाच्या विषयांवर आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक  आयोजित करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री यांनी सदर बैठकीत शिष्टमंडळास दिली .

यासाठी सोलापूर विकास मंचाने शासनाला  व प्रशासनासाठी थोडासा कालावधी  द्यावा व तोपर्यंत नियोजित आंदोलन संस्थगित करावे, अशी विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली*. त्यांच्या या विनंतीचा मान राखत व सोलापूरच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे व मुख्यमंत्री व ते स्वतः या प्रश्नाबाबत पुढाकार घेणार आहेत या उद्देशाने सोलापूर विकास मंचाच्या वतीने शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी होणारे आंदोलन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूर विकास मंचाने स्पष्ट केले की, सोलापूरच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर शासनाकडून ठोस कार्यवाही झाली तर मंच शासनास पूर्ण सहकार्य करेल. मात्र, दिलेल्या कालावधीत अपेक्षित प्रगती न झाल्यास पुढील आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यात येईल.

या बैठकीस सोलापूर विकास मंचाचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, ॲड.दत्तात्रय अंबुरे, प्रा. प्रसन्न नाझरे, सुहास भोसले, आनंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments