निंबर्गी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शिक्षण, गुणवत्ता आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण निंबर्गी गावातील कु. अलिया पैंगबर मुल्ला हिने घालून दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या "आजचा विद्यार्थी, उद्याचा लोकप्रतिनिधी" या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमध्ये एक दिवसासाठी सरपंचपदाची संधी देण्यात आली. या उपक्रमासाठी निंबर्गी गावातील अलिया पैंगबर मुल्ला हिची निवड झाली आहे.
अलियाच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि लोकशाही व्यवस्थेची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलियाच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
या यशाबद्दल अलिया, तिचे पालक तसेच संपूर्ण कुटुंबीयांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. पंचायत समिती सदस्य सौ. दुपारगुडे ताई, सरपंच श्रीदिप हसापुरे यांनीही अलियाचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे, राहुल दुपारगुडे, अप्पासाहेब पुजारी, अनिल सुतार, अप्पासाहेब कोळी, सिद्धाराम कोळी, परमेश्वर दुपारगुडे, दत्ता कोळी, मल्लीनाथ लाडे, अरविंद दुपारगुडे, सुरेश पालवे तसेच समस्त निंबर्गी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
"गुणवत्तेची ओळख, नेतृत्वाची सुरुवात; निंबर्गीच्या अलियाने गावाचे नाव उज्ज्वल केले!" 🌹👏🏻🎉





0 Comments