सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | महर्षी वाल्मीकी शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग ता. बार्शी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षामध्ये जुळे सोलापूर येथील ग.सा. पवार प्राथमिक शाळा, भारती विद्यापीठ येथील विद्यार्थी रणवीर अमोल सुकळे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत असलेल्या रणवीरने या परीक्षेत १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात अकरावा, केंद्रात तिसरा आणि जिल्ह्यात आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रणवीरच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक तसेच हितचिंतकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.


0 Comments