सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांनी श्री. जगन्नाथ धाम पुरी उत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. त्रिवेणी कल्चरल सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय डान्स म्युझिक महोत्सवात या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांमध्ये पुरस्कार मिळवले.
विद्यालयाच्या गुरु लतिका बल्ला यांना नृत्य गुरु सन्मान, प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच सोलो डान्स प्रकारात कु.रेणू खंडू भोसले आणि कु. नयना पुल्ली, कु. श्रेया साळुंके यांना प्रथम पुरस्कार मिळाले, तर सेमी क्लासिकल नृत्य स्पर्धेत पुर्वा मुंडे हिने यश संपादन केले. शास्त्रीय नृत्यात वृंदावनी रापेल्ली, सिध्दी गवई, श्रेया शेडजाळ आणि विष्णुप्रिया कोळी यांनी यश मिळवले. ड्युएट डान्समध्ये ईश्वरी जकाते आणि अपर्णा मडीवळ यांना पुरस्कार मिळाला, सेमी क्लासिकल प्रकरात प्रगती मोने व वर्षा मोने यांचा गौरव करण्यात आला. शास्त्रीय नृत्यात त्रिगुणा द्यावनपल्ली, मायरा गनबोटे, विराश्री बिज्जरगी आणि मेघना पामूल यांनी यश मिळवले. तर समूह नृत्य प्रकारात अखिला बिटला, कृतिका वजमाने, आध्या धोत्रे यांच्यासह अन्य विद्यार्थिनींना पुरस्कार मिळाले. वरिष्ठ सेमी क्लासिकल नृत्यात नक्षत्रा मिठठाकोल आणि प्रसन्ना कोडम यांनीही यश संपादन केले.
यशस्वितांना चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना रघुनाथ गडडम, मोनिका द्यावनपल्ली आणि लतिका बल्ला यांचे मार्गदर्शन लाभले.





0 Comments