Advertisement

Breaking News
Loading...

निसर्ग लोकसंचलित साधन केंद्र मंद्रुपच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व याबद्दल प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती,,,

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत, निसर्ग लोकसंचालित साधन केंद्र, मंद्रूप या कार्यालयाअंतर्गत आज ०५/० ६/ २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंद्रूप, अकोले मंद्रूप, बसवनगर, माळकवठे येथे वृक्षारोपण, हवामान बदल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी १०० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. या प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूरचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी मा. दिपक टेकाळे  हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .

यावेळी मार्गदर्शन करीत असताना पर्यावरणावर प्रदूषणाचा होणारा दुष्परिणाम,  वृक्षसंवर्धनाचे महत्व,परसबागेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महिलांना रोपे वाटप करण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आला.

 या वृक्षारोपण करण्यासाठी व्यवस्थापक रेखा कदम, लेखापाल स्वाती घेरडे, LDC विनायक ख्याडे  सहयोगीनी अनिता कोरे, यशोदा पुजारी, अर्चना शिंदे, सविता टिंगरे, मनिषा केवटे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments