Advertisement

Breaking News
Loading...

पर्यावरण दिनानिमित्त लोकमंगल साखर कारखान्यात वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकमंगल साखर कारखाना येथे वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचे कर्मचारी, स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत परिसरात विविध प्रकारची रोपे लावली. तसेच वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जैवविविधतेचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे महेश देशमुख यांनी सांगितले. प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी व वीज बचत करणे तसेच स्वच्छता राखणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला.

यावेळी चेअरमन महेश देशमुख, संचालक पराग पाटील, प्रशांत पाटील, मोहन पिसे, सुनिल यादव, चेतन काळे, एस. गुणसेकरन, गजराज रूद्रमठ, दिपक नलावडे, राहुल खटके, किशोर जोशी, राजू नन्नवरे, सचिन नन्नवरे, श्रीशैल लोखंडे, मनीष दापुरकर, तुकाराम यादव, राजकुमार सगर, नंदकिशोर कदम यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments