Advertisement

Breaking News
Loading...

वांगी येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; फरार आरोपीला मंद्रूप पोलिसांकडून सोमेश्वर पिंपरीतून अटक...

 


मंद्रूप, दि. ५ जून : जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीला अवघ्या काही तासांत सोमेश्वर पिंपरी (ता. मोहोळ) येथून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेंगे वस्ती (वांगी) येथे फिर्यादी अरिफा महमद कोरबू (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित महादेव तानाजी ठेंगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने रागाच्या भरात राजेभाई फकीर व फिर्यादी यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व डीबी पथकाने तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सोमेश्वर पिंपरी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

या प्रकरणी भाग ५, गुरनं. २३२/२०२६ असा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राज डांगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक फौजदार बापू शिंदे, हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग तसेच पोलीस कॉन्स्टेबल लखन पवार व माजिद शेख यांनी सहभाग घेतला.



Post a Comment

0 Comments