Advertisement

Breaking News
Loading...

शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी झटणारे ध्येयवेडे नेतृत्व; समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत त्यांनी राज्यभरात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शालार्थ आयडी, वेतन, सेवाविषयक अडचणी तसेच प्रशासकीय त्रुटींच्या निवारणासाठी त्यांनी शिक्षण विभागाशी समन्वय साधत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय झाल्यास महासंघाच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे.

अण्णासाहेब भालशंकर यांनी संघटनेचा विस्तार केवळ सोलापूरपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर केला. विविध जिल्ह्यांतील शिक्षकांना एकत्र आणून त्यांनी महासंघाला राज्यव्यापी बळ दिले. नव्या व तरुण कार्यकर्त्यांना संधी देत नेतृत्व विकसित करण्याचे कार्यही त्यांनी यशस्वीपणे केले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने केवळ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला नाही, तर सकारात्मक संवाद आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्याची कार्यपद्धती अवलंबली. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून बहुजन समाजातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना समान संधी आणि न्याय मिळावा, या उद्देशाने ते कार्यरत आहेत. शिक्षकांनी समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी, अशी त्यांची भूमिका असून त्यांनी संघटनेला सामाजिक जाणिवांची दिशा दिली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांपासून ते प्राथमिक शिक्षकांपर्यंत सर्वांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अण्णासाहेब भालशंकर यांच्याबद्दल शिक्षक व कर्मचारी वर्गात विशेष आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.

शिक्षक, कर्मचारी आणि बहुजन समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या ध्येयवेड्या नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

– प्रा. अभिजीत भंडारे, सोलापूर



Post a Comment

0 Comments