Advertisement

Breaking News
Loading...

लोको पायलट व टेक्निशियन भरतीसाठी मोफत ३ दिवसीय मार्गदर्शन शिबिराचा यशस्वी समारोप; वर्षभर सशुल्क क्लासेसची घोषणा...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | रेल्वेतील लोको पायलट आणि टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचा आज, दि. ७ जून रोजी उत्साहात समारोप झाला. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला.

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत मोहित चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. दि. ५, ६ आणि ७ जून दरम्यान घेतलेल्या या क्लासेसमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेचे स्वरूप, अभ्यास पद्धती, तसेच परीक्षेतील महत्त्वाचे मुद्दे यावर विशेष भर देण्यात आला.

या तीन दिवसीय शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना लोको पायलट आणि टेक्निशियन पदांच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळाली. शिबिराच्या सांगता समारंभात प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मोहित चौधरी सर यांनी सांगितले की, या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आता पुढील एक वर्ष नियमित क्लासेस सुरू ठेवण्यात येणार आहेत .

या कार्यशाळेमुळे ग्रामीण व शहरी भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मंडळ सचिव उल्लास बागेवाडी यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना रेल्वे भरती प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठीच या मोफत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली असून, भविष्यातही अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



Post a Comment

0 Comments