टाकळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी गावातील बसस्थानकाजवळ सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत ₹11,205 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र चव्हाण यांच्या पथकाने 14 जुलै रोजी दुपारी सुमारे 3.10 वाजता टाकळी बीट परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई केली. टाकळी बसस्थानकाजवळील टपरीसमोर एक व्यक्ती येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडून कल्याण मटका जुगार स्वीकारत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून सिद्धराम जगन्नाथ झेंडेकर (वय 53, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ₹10,200 रोख रक्कम, मटका आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या, एक बॉलपेन व सॅमसंग कंपनीचा कीपॅड मोबाईल असा एकूण ₹11,205 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments