शिरापूर (ता. मोहोळ) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शिरापूर येथे आज गणपती सभा मंडपाचे उद्घाटन सोलापूरच्या खासदार प्रणिती ताई सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी परिसरातील विविध विकासकामांसंदर्भात खासदारांना निवेदन सादर केले.
निवेदनात मौजे मोरवंची येथील गट क्रमांक 118/2 मधील श्री बाळूमामा मंदिरासमोर सभा मंडप उभारणे, शिरापूर येथील कोळेकर, कुलकर्णी, शितोळे, ताकमोगे, साठे, कावळे, गोफणे आदी वस्त्यांसाठी पानंद रस्ता करणे, लोकमंगल कारखाना रस्ता ते शिरापूर रस्त्याचे डांबरीकरण, शिरापूर ते खुनेश्वर रस्त्याचे डांबरीकरण तसेच शिरापूर येथील दलित वस्तीत बुद्ध विहारासाठी समाजमंदिर बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अनिल आबाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.



0 Comments