सांगोला | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील दिवंगत लक्ष्मण मोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रा. डॉ. जवाहर मोरे यांच्या पुढाकारातून यशस्वी उद्योजक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांद्वारे समाजसेवेचा आदर्श घालून देण्यात आला.
यावेळी सुभाष हॉटेलचे मालक दत्तात्रय माळी यांना 'यशस्वी उद्योजक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाटंबरे येथील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सांगोला येथील आरोग्य सल्लागार डी. एम. जाधव यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करून सुमारे ७५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्यानंतर 'मागेल त्याला झाड' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. संध्याकाळी जनसेवा गायन पार्टी, उंबरगाव यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले.
पुण्यस्मरण विधी बौद्धाचार्य बापूसाहेब ठोकळे यांनी पार पाडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश धनवडे, संजय धनवडे, निलेश धनवडे, पंकज धनवडे, विघ्नेश बनसोडे आणि संस्कार धनवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 Comments