Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलिसांची मोठी कारवाई! बलेनो कारमधून 42 हजारांहून अधिक रुपयांची दारू जप्त; एकास अटक...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांची बिअर व विदेशी दारू, बलेनो कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ₹7 लाख 63 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास 13 मैल ते टाकळी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना शेखर गुरबाळाप्पा बगले (वय 35, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) हा बलेनो कारमधून दारू घेऊन जाताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून टुबर्ग कंपनीच्या 650 मिलीच्या 48 बिअर बाटल्या, रॉयल स्टॅगचे 180 मिलीचे 40 कॉटर, इम्पीरियल ब्ल्यूचे 42 कॉटर, किंगफिशरच्या 500 मिलीच्या 24 बिअर टिन्स आणि ब्लेंडर्स प्राईडचे 13 कॉटर असा दारूसाठा जप्त केला. जप्त दारूची किंमत ₹47,620 असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय ₹7 लाखांची बलेनो कार (MH-13-EK-4918), ₹25 हजारांचा मोबाईल आणि ₹1 हजार रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 420/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65(ई) व 65(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गणेश जगन्नाथ पाटील यांनी दिली असून, तपास हेड कॉन्स्टेबल गुरव करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही GPSI चव्हाण यांनी केली.



Post a Comment

0 Comments