Advertisement

Breaking News
Loading...

आगीत संसार जळाला; माणुसकीने पुन्हा उभारी दिली पोलीस पाटील धर्मराव कोळी यांच्या कुटुंबाला डॉ. सतीश कोळींचा मदतीचा हात...

बसव नगर (तेरा मैल)| हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |सोलापूर तालुक्यातील बसवनगर (१३ मैल) येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत बोळकवठे येथील पोलीस पाटील धर्मराव कोळी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेनंतर संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला प्रसिद्ध समाजसेवक व रुग्णसेवक डॉ. सतीश कोळी (टाकळी) धावून आले.

बसवनगर येथील धर्मराव कोळी यांच्या घरातील फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घरातील कपडे, अन्नधान्य, फर्निचर, भांडी तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या दुर्घटनेमुळे कोळी कुटुंबावर मोठे संकट ओढवले.

घटनेची माहिती मिळताच डॉ. सतीश कोळी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांना धीर दिला. केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांनी नवीन संसारोपयोगी साहित्य, भांडी व आवश्यक वस्तूंची मदत करून कुटुंबाला पुन्हा संसार उभा करण्यासाठी आधार दिला.

यावेळी वांगीचे माजी पोलीस पाटील धर्मराज खडाखडे, संजय वाघमारे, औरादेचे पोलीस पाटील सैपन बेगडे, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

डॉ. सतीश कोळी यांच्या या संवेदनशील पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत असून, संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे येणारी माणुसकीच समाजाची खरी ताकद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

“पोलीस पाटील गावातील शांतता व सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कार्यरत असतात. त्यांच्या कुटुंबावर आलेले संकट हे आपल्या समाजावरील संकट समजून, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून ही मदत केली आहे."

— डॉ. सतीश कोळी, समाजसेवक, टाकळी





Post a Comment

0 Comments