मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी डिजिटल शेतकरी संघटना, शिरापूर (सो.)चे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११.३० वाजता ३०५ जनावरांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले असून, चारा डेपो तातडीने सुरू करावेत, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोर्चासाठी अद्याप पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.
जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या या मोर्चाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


0 Comments