Advertisement

Breaking News
Loading...

नूतन समाज कल्याण अधिकारी सागर सोनवणे यांचा बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघातर्फे सत्कार...

 

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे नूतन समाज कल्याण अधिकारी श्री सागर सोनवणे यांचे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगीकर, प्राचार्य काशिनाथ जंगलगी, शिवानंद कटके, बलभीम हांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नूतन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबवून वंचित, दुर्बल व गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments