मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : कायद्याचा धाक दाखवत मंद्रूप पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करत अक्षरशः “सर्जिकल स्ट्राईक” केला आहे. अवघ्या 24 तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 13 जुगार्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून तब्बल ₹6,66,920/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
टाकळी येथे 8 जणांना रंगेहाथ पकडले (दि. 17 मार्च)
टाकळी येथे शिवानंद घोडके यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडसमोर उघड्यावर “मन्ना” जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे छापा टाकला.
या कारवाईत खालील 8 आरोपींना अटक करण्यात आली:
सागर दयानंद शिंदे (25)
रेवणसिद्ध सिद्धप्पा मांग (22)
सागर बालाजी मिरजे (24)
रवीकुमार हनुमंत वग्गे (36)
संतोष महादेव केरूर (22)
शिवानंद लक्ष्मण घोडके (27)
नितीन दयानंद शिंदे (24)
चाँद नबीलाल नदाफ (30)
या ठिकाणाहून ₹5,11,200/- किमतीच्या मोटारसायकली, मोबाईल, रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
इंदिरानगर, मंद्रूप येथे 5 जणांवर कारवाई (दि. 16 मार्च)
याआधी इंदिरानगर परिसरात चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 आरोपींना पकडण्यात आले:
तानाजी मुकुंदा मरीआई वाले (33)
रंगप्पा शंकर मरेईवाले (34)
रेवणसिद्ध सोमलिंग कांबळे (35)
पुतळाप्पा भीमराव कांबळे (30)
अशोक सिद्धप्पा कांबळे (32)
या कारवाईत ₹1,55,720/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई:
दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 च्या कलम 12(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही धडक मोहीम राबवली.
कडक इशारा:
“कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटणार नाही,” असा स्पष्ट इशारा मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिला असून, या कारवाईमुळे जुगार व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

0 Comments