Advertisement

Breaking News
Loading...

“बोरामणीत इफ्तारचा अनोखा संदेश: ‘धर्म वेगळे, पण मनं एक’ — एकतेचा सुंदर सोहळा”...

 


बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात बोरामणी गावात सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देणारा उपक्रम मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता पार पडला. धनेश आचलारे मित्र परिवारातर्फे आयोजित इफ्तार पार्टीत हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत बंधुभावाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

या उपक्रमाचा उद्देश केवळ इफ्तार साजरा करणे नसून, “धर्म वेगळे असले तरी मनं एकच आहेत” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता. गावातील सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकतेची परंपरा अधिक दृढ केली.

तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सोमनाथ कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “बोरामणी हे गाव नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण राहिले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. धनेश आचलारे मित्र परिवाराचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.”

शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बोरामणी गावात हिंदू आणि मुस्लिम सण एकत्र साजरे केले जातात. यात्रांपासून ते सामाजिक कार्यक्रमांपर्यंत सर्वजण एकत्र येतात. येथे कधीही धर्मभेद पाळला जात नाही, हीच आमची खरी ओळख आहे.”

या इफ्तार सोहळ्यास माजी सरपंच इसुलाल पटेल, गौसभय्या शेख, वजीर मुजावर, सैपन पटेल, चन्नूमामा मटगे, आप्पा हलसगे, माजी सरपंच अनिल ननवरे, नागनाथ पाटील, संजय माळी, नागनाथ हुकीरे, मुस्ताक नदाफ पैलवान, रफिक मुजावर, पप्पू पटेल, बदर पटेल, सद्दाम नदाफ, शौकत मुजावर, दादा पटेल, अकबर मुजावर, जावेद तगारे, मलिक शेख, सैपन शेख, संजू पटणे, जैनुद्दीन नदाफ, सलाम पटेल, आतिक पटेल, सरदार शेख, सैपन फुलारी, साहेबलाल शेख, मुन्ना पठाण, सिद्धाराम विभुते, सिद्धाराम माळी, शिवपुत्र हेबळे, व्यंकप्पा पवार, कैलास राजगुरू, चंद्रकांत राजगुरू, शितल मस्के, सिराज पटेल, सादिक पटेल, महादेव पाटील, कैलास वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोरामणीतील हा इफ्तार सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, “एकतेतच शक्ती” या विचाराला उजाळा देणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा ठरला.


Post a Comment

0 Comments