Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी ठेवलेल्या 6 गाईंची सुटका, 2 आरोपींवर गुन्हा...


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात ठोस पाऊल उचलत कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने बांधून ठेवलेल्या सहा गाईंची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ₹1,40,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 15 मार्च रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुरघोट परिसरातील एका शेतातील गोठ्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणून ठेवण्यात आली आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात आरोपींनी त्यांच्या शेतातील गोठ्यात सहा गाई (पाच मोठ्या व एक वासरू) कत्तलीसाठी आणून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व गाईंची सुटका केली. त्यानंतर या जनावरांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून सुरक्षिततेच्या दृष्टीने अहिंसा गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी बादशहा इमान सुतार (वय 55, रा. कुरवड) आणि मोहम्मद अली कुरेशी (वय 19, रा. लष्कर, सोलापूर) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत कलम 11(1)(e) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 च्या कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

“प्राण्यांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही,” असा कडक इशारा पोलिसांनी दिला असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments