Advertisement

Breaking News
Loading...

*नूतन पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे यांच्या पुढाकारातून मंद्रूपमध्ये इफ्तार पार्टी; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश...*

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :

भाजपचे नूतन पंचायत समिती सदस्य मनसिद्ध मुगळे यांच्या वतीने मंद्रूप येथे रमजानच्या पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकतेचे अनोखे उदाहरण घालून दिले.

इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्व धर्मीय नागरिक एकत्र येत बंधुभाव, सौहार्द आणि परस्पर आदराची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजानच्या संदेशातील संयम, त्याग आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित केले.

मळसिद्ध मुगळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक मजबूत होते. आपली संस्कृती ही विविधतेत एकतेची आहे, आणि ती जपणे हीच काळाची गरज आहे.”

या इफ्तार पार्टीमुळे मंद्रूप परिसरात सामाजिक सलोखा आणि एकतेचा सकारात्मक संदेश पोहोचला असून, सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

यावेळी माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला, माजी सरपंच नजीर आवटे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ,  उद्योजक शिवराज कालदे, बाबुलाल निगेवान, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, यासीन मकानदार, सुरेश टेळे, संजय कांबळे, मौलाना अब्बास रजा, अनिकेत पाटील, महिबुब मुल्ला, सादिक मुल्ला, रझाक निगेवान, आरिफ शेख, अफसर मुल्ला, सद्दाम शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments